जळगाव : येत्या१५ नोव्हेबर २०२१ रोजी जळगाव येथिल शासकिय विश्राम गृह येथे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकिचे आयोजन करण्यात आले आहे. सोबत उत्तर महा. प्रवक्ते अॅड. गौतमजी सांळुखे , जि. नियोजन समिती प्रमुख महेशजी तायडे , जि . नियोजन समिती उपाध्यक्ष सदाशिवजी निकम , कामगार मंच जिल्हा अध्यक्ष युवराजजी सोनवणे प्रसिद्धी प्रमुख धनराज घेटे याच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. [ads id="ads2"]
तरी जिल्हाभरातिल तालुक्यातिल अध्यक्ष , उपाध्यक्ष व तालुका कार्यकारणीचे प्रमुख पदाधिकार्यांनी आपल्या कामाचा आढावा प्रस्तुत करणार आहे .त्या प्रसंगी प्रत्येक तालुक्यातिल सामाजिक स्तरावरील समस्या संदर्भात चर्चासत्र होणार आहे. [ads id="ads1"]
⭐ मुख्य विषय⭐
१) २६ नोव्हेंबर २०२१ संविधान दिवस साजरा करणे
२) ग्रामिण तसेच शहरी भागातिल सन २०११ पूर्वीचे सरकारी जागेवर केलेले अतिक्रमण कायम करणे
३) तालुका स्तरावर रुग्णालयातिल रुग्णांना आवश्यक ती मदत करणे
४) संघटनेच्या पदाधिकार्यांच्या समस्या जाणून घेणे व त्यांचे निराकरण करणे
५) प्रत्येक तालुक्यातिल ग्रामीण भागातिल समस्या तालुका अध्यक्ष यांच्या माध्यमातून जाणून त्या समस्यांचे निराकरण करणे
६) सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या जाणून घेणे
७) महिला सक्षमिकरणा विषयी चर्चा करून नियोजन करणे
८) शासनाच्या विविध कल्याणकांरी योजनाची माहिती कार्यकर्त्याना देणे
या बैठकिला तालुका अध्यक्ष व पदाधिकारी यांनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.