रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे)केंद्र सरकारकडून कृषी विषयक तीन कृषी कायदे संसदेत पारित करण्यात आले होते हे तीन कृषी कायदे आज मागे घेण्याचा निर्णय घेतला हा शेतकऱ्यांचा एकजुटीचा विजय असून पण हे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण असल्याचे टीकास्त्र सोडत आज दिनांक १९ नोव्हेंबर शुक्रवार रोजी रावेर येथे बोलतांना राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केंद्रावर तोफ डागली आहे.[ads id="ads2"]
जिल्हा बँकेच्या निवडणुक प्रचार संदर्भात रावेर येथे सहकार पॅनलच्या मेळाव्याप्रसंगी संवाद साधताना खडसे म्हणाले, भारतीय जनता पक्षाला नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्यामुळे केंद्र सरकारला ते तीन कृषी कायदे रद्द करावे लागले आहेत. [ads id="ads1"]
केंद्र सरकारने हा उशिरा का होईना पण शहाणपणाचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांवर अत्याचार करण्यात आले. त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, त्यांच्यावरती लाठीमार करण्यात आला, यात अनेक शेतकऱ्यांना मरण आले. पण शेतकऱ्यांनी एकजूट दाखवल्यामुळे केंद्र सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आहे. खरं तर हा निर्णय खूप उशिरा घेण्यात आलेला असून उशिरा का होईना हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याचे म्हणत एकनाथराव खडसे यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.