औरंगाबाद येथील आमदार संजय शिरसाट यांचा यावल तालुका ग्रामसेवक युनियनतर्फे तीव्र निषेध.

अनामित
[ads id="ads2"]
यावल वार्ताहर (सुरेश पाटील) औरंगाबाद पश्चिम विभागाचे आमदार संजय शिरसाट यांनी ग्रामसेवकांनबाबत चिथावणीखोर अपशब्दाचा वापर जाहीररित्या केल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन यावल तालुका शाखेतर्फे यावल पोलीस निरीक्षक,यावल तहसीलदार,यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे तसेच गुन्हा दाखल न केल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला.
    [ads id="ads1"]
     महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन यावल तालुका शाखेचे पदाधिकारी ग्रामसेवकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,औरंगाबाद पश्चिम विधानसभा क्षेत्रातील आमदार संजय शिरसाट यांनी दि.8नोव्हेंबर2021रोजी औरंगाबाद येथे सरपंचाचे प्रशिक्षण कार्यशाळेत भाषण करताना शासकीय व्यासपीठावरून ग्रामसेवक सर्ववर्गाबद्दल "भामटा, हरामखोर"इत्यादि अपशब्द वापरून संवर्गाची बदनामी केली तसेच ग्रामविकासात सरपंच, ग्रामसेवक यांचे सयुक्तिक जबाबदारीचे भान न ठेवता दोघांमध्ये तेढ निर्माण कशी होईल अशा दृष्टीने ग्रामसेवक तुमचा नोंकर आहे तो तुमच्या हाताखाली काम करतो त्याचे ऐकू नका,असे बेजबाबदार विधान करून दोन ग्रुपमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले व चिथावणीखोर भाषण करून संपूर्ण महाराष्ट्रात चुकीचा संदेश देऊन ग्रामसेवक सहभागाविषयी अविश्वासाचे वातावरण तयार केले.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामसेवक संवर्ग प्रचंड तणावात आला असून संवर्गात असंतोष निर्माण झाला आहे.
        
 यामुळे आमदार संजय शिरसाट यांच्यावर भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 107,288, 294, 499, 504, 506 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात आज नोंदवत असलेला निषेध व एक दिवस काम बंद आंदोलनाचे रूपांतर मोठ्या आंदोलनात होईल,तरी गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन यावल तालुका शाखा सचिव,सचिव,सल्लागार, अध्यक्ष यांनी केली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!