रावेर - एसटी वाहक व चालक कर्मचाऱ्यांचे आपल्या कर्तव्या पोटी विविध मागण्यांसाठी गेल्या आठवडयापासून उपोषण चालू आहे . त्यात पगारामंध्ये शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वाढ व्हावी, विविध प्रकारचे भत्ते मिळावेत , कर्मचाऱ्यांचा भविष्य विमा वादावा व शासकीय कर्मचारी म्हणून त्यांना मान्यता मिळावी यासाठी त्यांचे प्राणांतिक उपोषण चालू आहे .
[ads id="ads2"]
आम्ही परिषदेच्या सर्व शक्तीनीशी एसटी कर्मचारी यांच्या आंदोलनाला पुर्ण पाठींबा असून त्यासाठी आम्ही सक्रिय आहोत. त्याद्वारे शासनाला प्रस्तुत मागण्या मान्य करण्यासाठी परिषद सर्व शक्तिनिशी आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणार असून त्याची परिणती म्हणून कर्मचाऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी
[ads id="ads1"]
व आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हाध्यक्ष श्री. रौनक तडवी ,जिल्हा कार्याध्यक्ष श्री.लियाकत तडवी , यावल तालुकाध्यक्ष श्री.फिरोज तडवी, रावेर तालुकाध्यक्ष श्री. मेहमूद तडवी आणि आदी परिषदेच्या पदाधिकारी यांनी यावल आणि रावेर डेपोच्या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली बट यावेळी जिल्हाध्यक्ष रौनक तडवी यांनी आंदोलकांना धीर दिला आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन परिषदेमार्फत दिले आहे .....
