Jalgaon : जिल्ह्यातील एसटीच्या 91 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई ; रावेर आगारातील 12 जणांचा समावेश

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


जळगाव(विशेष प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाचे ( एसटी ) राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी Maharashtra राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे.[ads id="ads2"] 
 मा. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने समिती नेमण्याबाबत अधिसूचना काढूनही एसटी संघटनांनी संप मागे घेतला नाही. अखेर एसटी महामंडळाच्या विभागीय पातळीस्तरावरून गुरुवारी कारवाईचा बडगा उगारत जळगाव विभागातील ८ आगारांतील ९१ कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून, या कर्मचाऱ्यांबरोबर जळगाव आगारातील ६०० आंदोलक कर्मचाऱ्यांनाही निलंबित करावे, अशी मागणी गुरुवारी आंदोलकांतर्फे मनोज सोनवणे यांनी केली आहे.[ads id="ads1"] 
   एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी पाच दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे एसटीची जिल्ह्यातील ११ आगारांतील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. तर प्रशासनाने कर्मचाऱ्यांना आंदोलनासाठी प्रोत्साहित करणे व कामावर रुजू होऊ न देणे या कारणांसाठी गुरुवारी जळगाव विभागातील ९१ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.

जळगाव विभागातील ९१ कर्मचारी निलंबित 

 जळगाव विभागात गुरुवारी एकूण ९१ कर्मचारी निलंबित करण्यात आले. यात रावेर १२, मुक्ताईनगर १०, पाचोरा १२, चाळीसगाव १५, जामनेर १०, भुसावळ १४, चोपडा ८, अमळनेर १० असे विभागातील ९१ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!