पोलिस दादाची कौतुकास्पद कामगिरी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

मुक्ताईनगर : अकोला जाण्यासाठी मुक्ताईनगर बस स्थानकात एक वयोवृद्ध एसटीची वाट बघत बसले होते. त्या वयोवृद्धला खाजगी वाहनात खामगाव पर्यंत येथे ड्युटीला असलेले पोलिस अंमलदार  रवींद्र तायडे यांच्या मदतीने रवाना केले आहे.[ads id="ads2"] 

असे पोलिस अंमलदार रवींद्र तायडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, त्या वृद्धांकडे फक्त अर्ध्या तिकिटाचे भाडे होते.

सविस्तर वृत्त  असे की, काल मुक्ताईनगर बस स्थानक येथे ड्युटी करत असताना येथे एक आजीबाई आल्या वय अंदाजे 80 ते 85 विचारू लागल्या अकोला जाण्यासाठी गाडी आहे का ? बस कर्मचाऱ्यांचा आंदोलन असल्याने सर्व बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या, असे पोलिस अंमलदार  रवींद्र तायडे यांनी आजीला सांगितले. [ads id="ads1"] 

  तेव्हा ती आजी खूप घाबरुन गेली व आता मी कशी अकोल्याला जाणार माझ्याजवळ तर अर्ध्या तिकिटाचे पैसे आहे असे पोलिस अंमलदार  रवींद्र तायडे यांना सांगू लागली. पोलिस अंमलदार  रवींद्र तायडे हे आजीला म्हणाले, आजीबाई काही काळजी करू नका ? मी, करतो काहीतरी तुमच्यासाठी मी लगेच आजीसाठी नाश्ता व पाणी घेऊन आलो. आजीला खाजगी वाहनात खामगाव पर्यंत बसवून दिले खाजगी वाहनाचे चालक पंकज कपले यांनी माझ्याकडून फक्त अर्ध्या तिकिटाचे पैसे घेतले अशाप्रकारे आजींना रवाना केले मनाला खूप समाधान वाटले खरंच गरजु माणसांची मदत केली गेली पाहिजे. असे पोलीस अंमलदार रवींद्र तायडे यांनी सांगितले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!