यावल : तालुक्यातील चितोडा येथे चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्यामुळे ३ मुलांना विषबाधा झाल्याचा प्रकार आज बुधवारी दुपारी उघडकीस आला.[ads id="ads2"]
विषबाधा झालेल्यामध्ये दोन जणांवर यावल रुग्णालयात उपचार सुरु असून एक जणाला भुसावळ येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर असे की, चितोडा येथे आज जि.प.शाळेच्या अंगणात खेळत असताना वरून योगेश इंगळे, कृष्ण किरण पाटील, दुर्गेश चंदू पाटील या तिघांनी चंद्रज्योती या फळाच्या बिया फोडून खाल्ल्या. मात्र काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागला. मुलांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरु झाला. सदर बाब लक्ष्यात येताच नागरिकांनी त्यांना तातडीने Yawal ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. यामधील वरून इंगळे या मुलाला पुढील उपचारासाठी भुसावळ येथे हलविण्यात आले आहे.
हे पण वाचा :- तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक कैलास नागरे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांच्या चौकशीला सुरुवात
दरम्यान, मुलांना उलट्या होत असल्याचे लक्ष्यात घेत त्यांना गावातील सरपंच सलीम तडवी, पोलीस पाटील पंकज वारके, ग्रा.प.सदस्य मनोज पाटीलसह आदींनी तिघांना तातडीने Yawal ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.