अजिंठा शासकीय विश्रामगृह प्रकरणातील घटनेची चौकशी करून जो कोणी असेल त्याला कायद्याच्या चौकटीत आणून कठोरात कठोर शिक्षा द्यावी

अनामित
[ads id="ads2"]
जळगाव जिल्हा महिला काँग्रेस किमीटी तर्फे ,जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार. 
जळगाव - येथील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या अजिंठा शासकीय विश्रामगृहात रगेंल लीला आणि मागासवर्गीय मुलीवर लैंगिक अत्याचार ? झाल्याची घटना चर्चिली जात असल्याने या घटनेची चौकशी करून जो कोणी असेल त्याला कायद्याच्या चौकटीत आणून कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी जनसामान्यांची मागणी असल्याचे निवेदन जळगाव जिल्हा महिला काँग्रेस किमीटी च्या  अनुु जाती जळगाव जिल्हाध्यक्षा सौ प्रतिभा मोरे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. तर जळगाव शहरात पुन्हा 1994 मधील वासना कांदाच्या घटनेला उजाळा मिळत आहे का यासंदर्भात संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील राजकारणात समाजात चर्चेला उधाण आले आहे.
[ads id="ads1"]
        जिल्हाधिकारी जळगाव, यांना दिलेल्या निवेदनात जळगाव जिल्हा महिला काँग्रेस कमिटी अनु जाती जळगाव जिल्हाध्यक्ष सौ प्रतिभा मोरे यांनी म्हटले आहे की जळगाव येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात एका मागासवर्गीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला असल्याची बातमी समाज माध्यमांवर फिरत आहे ही अतिशय लज्जास्पद घटना आणि बाब आहे सदर मुलीची प्रकृती अस्वस्थ असल्याचे समजते हे ज्यांनी कोणी केले असेल त्याला कायद्याच्या चौकटीत आणून कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी जनसामान्यांची मागणी आहे.

 गुन्हेगार शोधून काढावेत गुन्हा करणारे एका राजकीय पक्षाचे उच्चपदस्थ असल्याने गुन्हा करणारे सदर प्रकरण दडपून टाकण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत तरी सदर प्रकरणी आपण योग्य ती दखल घेऊन गुन्ह्याचा शोध तात्काळ लावण्यात यावा व त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी विनंती वजा मागणी करण्यात आली आहे.
    एका मागासवर्गीय मुलीवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये दोन बडे राजकीय नेते सहभागी असल्याचे सुद्धा बोलले जात आहे यात जळगावातील बड्या नेत्याचा मुलगा सहभागी असल्याची सुद्धा चर्चा होती,एवढेच नव्हे तर काही जणांनी या घटनेचे थेट चाळीसगाव कनेक्शन देखील जोडण्याचा प्रयत्न केला असून याबाबत अधिकृत कुठलीही माहिती अद्यापही समोर आलेली नाही. जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देते वेळी जळगाव काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा सुलोचनाताई वाघ जळगाव कॉग्रेस अनु, जाती जिल्हाध्यक्षा सौ प्रतिभाताई मोरे, उपाध्यक्षा सविता सुरवाडे, सुनिता अडकमोल कल्पना मोरे हे उपस्थित होते... 

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!