रावेर प्रतिनिधी : रावेर येथील काँग्रेस इंदिरा भवनात २६ नोव्हेंबर संविधान दिवस भारताचे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी काँग्रेस नेता दिलरुबाब इकबालखा तडवी यांचे उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. [ads id="ads2"]
संविधान वाचवणे काळाची गरज असे प्रतिपादन आदिवासी काँग्रेस नेता दिलरुबाब इकबालखा तडवी यांनी केले.भारताचे संविधान न्याय, स्वातंत्र्य,समानता, बंधुता, लोकशाही संविधानाची शपथ घेण्यात आली. त्याप्रसंगी सरचिटणीस रामदास सेनु लहासे, मुंजलवाडी सरपंच योगेश ब्रिजलाल पाटील , जागीर बहादूर तडवी,रविंद्र भिल, दिपक कोळी ,संजय चौधरी,सूरदास सर, काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.२६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवान व आम जनता यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.

