कमळगाव प्रतिनिधी (खेमचंद धनगर) परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र अडावद अंतर्गत आरोग्य उपकेंद्र चांदसणी मार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ .जमादार साहेब , तालुका आरोग्य अधिकारी डॉ .लासूरकर साहेब वैद्यकीय अधिकारी डॉ . विष्णुप्रसाद दायमा यांच्या मार्गदर्शनाखाली हर घर दस्तक मोहिमेंतर्गत covid-19 लसीकरणाचे कार्य घरोघरी जाऊन करण्यात आले .
[ads id="ads2"]
सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने प्रकाश पारधी (आरोग्य सहाय्यक), डॉ.महेंद्र पाटील (आरोग्य सेवक), उज्वला परदेशी(आरोग्य सेविका) व आशा कार्यकर्ती संगीता धनगर यांनी घरोघरी जाऊन [ads id="ads1"]
लसीकरणाचे महत्व पटवून दिले व लोकांना प्रोत्साहित करून कोहीड लसीकरण करून घेतले .या लसीकरणामुळे दिव्यांग,वयोवृद्ध व कष्टाळू नागरिकांचे लसीकरण घडून आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळाली .लसीकरणाला साथ करा कोरोनावर मात करा असे आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगाव मार्फत आवाहन करण्यात आले .