वाघोड मध्ये श्री कुँवरस्वामी महाराज समाधी उत्सव सोहळा उत्साहात संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)

रावेर तालुक्यातील वाघोड येथे काल दि. ५ नोहेंबर शुक्रवार रोजी शंकराचा अवतार असले सद्गुरु श्री कुँवरस्वामी महाराजांचा यांचा समाधी सोहळा हा दरवरर्षी आश्विन प्रतिपदा म्हणजे दिवाळीच्या पाडव्याला साजरा करण्यात येतो.[ads id="ads2"] 

  त्याप्रमाणे या वर्षीसुध्दा हा उत्सव मोठ्या उत्साहात शुक्रवार रोजी साजरा करण्यात आला . यावेळी सकाळी शिवाजी चौकात असलेल्या महाराजांच्या समाधीला अभिषेक घालुन पुजा करण्यात आली त्यानंर दुपारी भजन होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला .त्यानंतर रात्री पालखी सोहळा काढण्यात आला हा पालखी सोहळा पालखीत महाराजांजी मुर्ती ठेवुन दिंडी सोहळ्या द्वारे गावातील प्रदक्षिणा मार्गाने पालखी प्रदक्षणा घालुन दिंडी सोहळा परत मंदिरात येऊन आरती होऊन सोहळ्याची सांगता करण्यात आली . [ads id="ads1"] 

या सोहळ्यासाठी रावेर सह तालुक्यातुन जळगाव , मुंबई , पुणे, नाशिक , मालेगाव सह राज्यभरातुन मोठ्या संख्येत भाविकांची उपस्थिती होती . तर दिवसभर दर्शनासाठी भाविकांची वर्दळ होती.

  या समाधी सोहळ्यासाठी पुजारी दिनेश दिक्षीत यांचे सह श्रीराम भजनी मंडळ व भजनी मंडळाच्या सदस्यानी परीश्रम घेतले . तर रावेर येथील अरुण सुगंधी वाले मंजीरी सुगंधीवाले , विलास महाराज आळंदीकर , रामदास महाराज  यांनी भजनात रंग भरला.

 शेकडो वर्षाची परंपरा कायम - 

कुँवरस्वामी महाराज यांनी वाघोड येथील आपले अवतार कार्य संपवुन अठराशे साली कार्तिक शु.प्रतिपदा या दिवशी समाधी घेतली . त्यानंतर सातव्या दिवशी सटाणा ताल्यक्यातील अंतापुर येथे प्रकट होऊन नाशिक पुणे भागात शंकर महाराज नावाने अवतारकार्य केले त्यानंतर पुणे येथील धनकवडी येथे समाधी घेतली तेव्हापासून आजतागायत वाघोड येथे हा समाधी सोहळा सुरू असून या सोहळ्यासाठी पुणे-मुंबई सह राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भक्तगण येत असतात.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!