[ads id="ads2"]
रावेर प्रतिनिधि (राजेश रायमळे) तामसवाडी ता.रावेर येथे पोलीस पाटील यांनी गावभर पत्रकं वाटत जिल्हा विधीसेवा प्राधिकरणा बाबत जनजागृती केली याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. ३०/ऑक्टोबर २०२१ रोजी रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास जी नांगरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांची बैठक घेऊन आपापल्या गावात जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाकडून प्राप्त पत्रके वाटून जनजागृती करणेविषयी मार्गदर्शन केले होते.
[ads id="ads1"]
त्यानुसार तामसवाडी ता.रावेर येथील महीला पोलीस पाटील सुलक्षणा राजेश रायमळे यांनी आपले गावात विविध ठिकणी जाऊन पत्रके वाटप करत व प्राधिकरणा बाबत सविस्तर माहीती देत जनजागृती केली प्राधिकरणा बाबत विविध ठिकाणी माहीती देत असतांना त्यांनी सांगितले की,जिल्हा विधीसेवा प्राधिकरण जळगांव, ची स्थापना लिगल सर्व्हिसेस ऑथाॅरीटी अँक्ट सन १९८७ नुसार झालेली असून मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जळगांव हे प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष तर वरिष्ठ न्यायाधीश हे सचिव असतात.व जिल्हा विधीसेवा प्राधिकरणा मार्फत विविध लोककल्याणकारी कायदेविषयक योजना राबविण्यात येतात, त्या सर्व योजनांची माहीती प्राधिकरणाकडून प्राप्त पत्रांमध्ये दिलेली असून सदर प्राधिकरणाकडून मिळणाऱ्या विविध सवलती व योजनांचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन केले यावेळी त्यांना साप्ताहिक सुवर्णदिप ता.रावेर प्रतिनिधी राजेश वसंत रायमळे यांचे अनमोल सहकार्य लाभले.