धक्कादायक : वाघोदा खुर्द येथील तत्कालिन ग्रामसेवकाने मजूर न लावताच केली कामे, नियमबाह्य केलेल्या कामांच्या चौकशीची मागणी...

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 धक्कादायक : वाघोदा खुर्द येथील तत्कालिन ग्रामसेवकाने मजूर न लावताच केली कामे, नियमबाह्य केलेल्या कामांच्या चौकशीची मागणी...[ads id="ads2"]  

वाघोदा प्रतिनिधी (समाधान गाढे) :  वाघोदा खुर्द येथील तकालीन ग्रामसेवक शिवाजी सोनवणे यांनी १४ वा वित्त आयोग निधीतून सन २०१५-१६ ते सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात प्राप्त निधीतून केलेल्या लाखो रुपयांचा निधी खर्च करून गावातील एकाही मजुराला कामावर लावलेले नाही, या पाच वर्षात केलेल्या एकाही कामाचे एकही हजेरी पत्रक भरलेले नाही. ग्रा प दप्तरी हजेरी पत्रकच उपलब्ध नसल्याची बाब माहितीच्या अधिकारात संतोष कोसोदे यांनी विचारलेल्या अर्जात ही माहिती उघड झाली आहे.[ads id="ads1"]  

गेल्या पाच वर्षांपासून ग्रामीण स्तरावर केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात १४ वित्त आयोगाचा निधी उपलब्ध होत असतो, उद्देश एकच की ग्रामीण स्तरावर मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात , तळागाळातल्या सामान्य माणसाला रोजगार मिळवून त्याचे जीवनमान उंचावे ; मात्र ग्रामपंचायत स्तरावर निधी खर्च करणारे ग्रामसेवक हे शासनाच्या निर्देशाला केराची टोपली दाखवून चुकीच्या पद्धतीने योजना राबवून योजनांबाबत संभ्रम निर्माण करीत आहेत, ग्रा.प.वाघोदा येथील तकालिन ग्रामसेवक हे सध्या रावेर तालुका ग्रामसेवक संघटनेच्या प्रभारी अध्यक्ष पदावर विराजमान आहेत, अध्यक्ष यांची अशी परिस्थिती आहे, तर Raver तालुक्यातील इतर ग्रामसेवक यांच्या कामकाजाची काय परिस्थिती असेल,याचा अंदाज न केला बरा, संतोष कोसोदे यांनी या प्रकरणी दि१/११/२०२१ रोजी गट विकास अधिकारी , रावेर यांचेकडे चौकशीची मागणी केली आहे, पंचायत समिती सदर ग्रामसेवका विरुद्ध कोणती कार्यवाही करते ते येणाऱ्या काळात समजेल.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!