नाशिक - महाराष्ट्र शासन, वित्त विभागांतर्गत विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांच्यामार्फत प्रशिक्षण सत्र क्रमांक 100 आयोजित करण्यात येत असून या प्रशिक्षणात लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहसंचालक लेखा व कोषागारे नाशिक विभाग डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.[ads id="ads2"]
सदर प्रशिक्षणाचा प्रस्तावित कालावधी 10 डिसेंबर 2021 ते 18 फेब्रुवारी 2022 असा 50 दिवसांचा आहे. या प्रशिक्षणासाठी पाच मॉड्युलप्रमाणे निश्चित केलेला तपशिलवार अभ्यासक्रम कोषागार अधिकारी नाशिक, धुळे, जळगांव, अहमदनगर व नंदूरबार यांच्या जिल्हा कोषगार कार्यालयात माहितीसाठी उपलब्ध आहे. या प्रशिक्षण सत्रासाठी कोणत्याही इच्छुक कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
[ads id="ads1"] 24 जून 2015 रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय कर्मचारी व नवनियुक्त कर्मचारी यांना प्रशिक्षण सक्तीचे केले आहे. तथापि पुर्णवेळ प्रशिक्षणासाठी शक्य नसल्यास विशिष्ठ ठराविक मॉडयूलसाठी कर्मचारी प्रवेश घेऊ शकतील. त्या अनुषंगाने नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगांव, अहमदनगर व नंदूरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कार्यलय प्रमुखांनी त्यांच्याकडील लिपिकवर्गीय व नवनियुक्त कर्मचारी यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात यावे, असेही सहसंचालक लेखा व कोषागारे नाशिक विभाग डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी कळविले आहे.
