रावेर तालुका प्रतिनिधि (राजेश रायमळे)
तामसवाडी ता.रावेर येथून जवळच असलेले श्री क्षेत्र ओंकारेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट भोकरी येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त कृतिका नक्षत्र देव दिवाळीच्या मुहूर्तावर भाविकांनी घेतले कार्तिक स्वामींचे दर्शन. [ads id="ads2"]
याबाबत सविस्तर वृत्त असे की,आज कार्तिक पौर्णिमा देव दीवाळी आणि कृतिका नक्षत्राच्या मुहूर्तावर येथील कार्तिक स्वामीचं मंदिर भक्तांसाठी उघडण्यात आले श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान ट्रस्ट भोकरी येथील खाली गाभाऱ्यात कार्तिक स्वामींच मंदिर असून वर्षातून एकदाच म्हणजे, कार्तिक पौर्णिमेला भाविक भक्त कार्तिक स्वामींचं दर्शन घेतात. आज इथे सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी होती.[ads id="ads1"]
असे म्हणतात पंचागा नुसार वर्षातील आठवा महीना कार्तिक महीना हा बारा महीन्यापैकी अधिक श्रेष्ठ महीना आहे. व भगवान श्रीकृष्णाला सुद्धा कार्तिक महीना खूप प्रीय आहे.पुराणांमध्ये कार्तिक महिन्याला स्नान, दान,व्रत व तपाच्या दृष्टीने खुप महत्व आहे.असे म्हणतात या महिन्यात स्नान, दान,दीपदान, व्रत, तप केल्याने पुण्य प्राप्त होते.कार्तिक महीन्यात कार्तिक कथांचे सुध्दा आयोजन केले जाते.
वर्षातून एकदाच कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यामागे देखील कार्तिक स्वामींची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे, ती अशी, असे म्हणतात की,शंकर आणि पार्वतीला दोन मुलं होती. मोठा कार्तिक आणि धाकटा गणपती. शंकरजींनी जेव्हा दोन्ही मुलांना आदेश दिला की, पृथ्वीची प्रदक्षिणा जो आधी पूर्ण करेल तो खरा बुद्धिमान असेल. असं म्हणताच कार्तिक स्वामी आपलं वाहन मोरावर बसून पृथ्वीच्या प्रदक्षिणेसाठी निघून गेले. गणपती मात्र जाडजूड असल्यानं जागेवर आपल्या आईवडिलांना प्रदक्षिणा मारून म्हटला की, माझी प्रदक्षिणा पूर्ण झाली. तेव्हापासून श्रीगणेशाला बुद्धिचं दैवंत समजलं जात असल्याचं म्हटलं जातं. पण जेव्हा कार्तिक स्वामी अनेक महिन्यानंतर पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून परत आले आणि त्यांना कळलं की, गणपतीला बुद्धिमान ठरविण्यात आलं. त्यावेळी ते संतापले आणि रागाने जंगलात तपश्चर्येसाठी निघून गेले. जेव्हा शंकर पार्वती कार्तिकेला भेटायला गेले. त्यावेळी कार्तिकने आपल्याच आईवडिलांना शाप दिला की, जो मला भेटायला येईल तो सातजन्म नरकात जाईल आणि महिला विधवा होईल. पण पार्वतीनं हट्ट करून कार्तिकेला म्हटलं अस करू नको. वर्षातून एक दिवस तरी आम्हाला भेट. त्यावेळी कार्तिकने कार्तिक पौर्णिमा याच दिवशी मी भक्तांना भेट देईल, असं जाहीर केलं. तेव्हापासून कार्तिक स्वामींच मंदिर वर्षातून फक्त कार्तिक पौर्णिमेला उघडण्यात येतं.
दरम्यान खाली भुयारात कार्तिक स्वामींच मंदिर असून हे खूप पुरातन मंदिर आहे. वर्षातून एकदाच दर्शन होत असल्याने इथे कार्तिक पौर्णिमेला दूर दुरून भक्त दर्शनासाठी येतात. आज सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती