रावेर येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे संविधान दिन साजरा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 
रावेर प्रतिनिधी : शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता 72वा सविधान दिन रावेर येथील विविध कार्यकारी सह सोसायटीच्या कार्यालयात  माजी नगराध्यक्ष हरीश शेठ गनवाणी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला प्रथम अध्यक्ष व मान्यवरांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून संविधान वाचन संविधानाचे वाचन करण्यात आले.[ads id="ads2"]  

   भारताचे संविधानामुळे लहानातल्या लहान तर मोठ्या व्यक्ती ला सुद्धा समान अधिकार देण्यात आले आहे आमच्या देशाची विविधता ही आमच्या घटनेमुळे एकसंघ राहिली असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष हरीश शेठ गनवाणी यांनी केले याप्रसंगी कामगार नेते दिलीप कांबळे मार्गदर्शन करताना म्हणाले  संविधानामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीचे जनक आहेत आज भारतामध्ये लोकशाही नांदत असेल तर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आणि म्हणून स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय यावर आधारित असलेली लोकशाही आम्ही अंगीकृत केलेली आहे.[ads id="ads1"]  

   याच प्रसंगी शिवसेनेचे संघटक अशोक शिंदे म्हणतात आमचा देश अतिशय महान आहे आमच्या देशात अनेक धर्म अनेक पंथ आणि संस्कृती असल्यावर  आमचा देश घटनेच्या आधारावर एकसंघ असा देश आहे जगात सर्वात श्रेष्ठ असलेली लोकशाहीचा देश भारत देश म्हणून ओळखला जातो याच प्रसंगी माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन म्हणतात आम्ही सर्वांनी 72 वर्षांमध्ये मध्ये संविधान दिवस साजरा करत असताना आमच्या देशाची 75 वी साजरी होत आहे आज आमचा देश संविधानामुळे जगात श्रेष्ठत्व मिळवत आहे आम्ही संविधानामुळे स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय हे आम्ही एक संघ होऊ शकलो .

 हेही वाचा : रावेर ते लालमाती पाल रस्त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड लिस्ट करण्याची गरज...

या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती कैलास वाणी ,डी .एन . महाजन पत्रकार राजेंद्र अटकाळे  ,पत्रकार राहुल गाढे ,पुंडलिक कोघे , राजेंद्र अवसरमल  ,सलीम शहा , अशोक वाघ  ,गोरेलाल , गौतम अटकाळे  , सुरेश अटकाळे  ,बाळा शिरतुरे,  कंदर सिंग बारेला , सुरेश बारेला , चंद्रसिंग बारेला बाळू रजाणे,दौलत अढागळे, सोसायटी चे सचिव बंडू कोतकर, संतोष महाजन, देविदास महाजन इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळू राजाराम शिरतुरे यांनी केले तर सूत्रसंचलन सुरेश अटकाळे 

 यांनी केले व आभार प्रदर्शन सलीम शहा यांनी केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!