रावेर प्रतिनिधी राजेंद्र अटकाळे
रावेर येथे आज दि. २६ नोव्हेंबर शुक्रवार रोजी भारतीय बौद्ध महासभा रावेर शहर शाखेच्या वतीने 71 वा संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.[ads id="ads2"]
यावेळी तहसिलदार उषाराणी देवगुणे, पोलीस निरीक्षक कैलास नागरे, स. पो. नि. शीतलकुमार नाईक,माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी, कामगार नेते दिलीप कांबळे, नगरसेविका रंजना गजरे, नगरसेवक जगदीश घेटे, माजी नगरसेवक ऍड. योगेश गजरे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष पंकज वाघ, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू सवर्णे यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दिप पूजा व धूपपूजा केली. यानंतर भारतीय बौध्द महासभेचे शहराध्यक्ष दिपक तायडे सर यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले. [ads id="ads1"]
याप्रसंगी तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून उपस्थितांना शपथ दिली तर पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी मनोगत व्यक्त करून संविधानाबद्दल माहिती दिली.
हेही वाचा : रावेर ते लालमाती पाल रस्त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड लिस्ट करण्याची गरज...
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे, फुले, शाहू, आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे , सुवर्ण दिप न्यूज चे मुख्य संपादक राहुल गाढे,जेष्ठ सामाजिक नेते अशोक शिंदे,तलाठी दादाराव कांबळे,रमण तायडे सर,उमेश गाढे, ऍड. सुभाष धुंदले, सामाजिक कार्यकर्ते संघरक्षक तायडे,यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार टाकून अभिवादन केले. कार्यक्रमांस , ऍड. मोहन कोचूरे, पुंडलिक कोघे, ज्ञानेश्वर अटकाळे, मगन भालेराव , लोंढे गुरुजी , खैरे,समता सैनिक दलाचे बाळू रजाने, अमर तायडे, अनिल घेटे, निलेश तायडे, गोविंदा लहासे, सदाशिव निकम, सम्येक इंगळे यांचेसह असंख्य समाज बांधव उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन दिपक तायडे सर यांनी तर आभार संघरक्षक तायडे यांनी केले.

