[ads id="ads2"]
रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) तालुक्यातील सुलवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते मनोहर कोळी यांनी आज दिनांक १ आक्टोंबर सोमवार रोजी रावेर येथील पंचायत समितीच्या जवळ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले याबाबत
[ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे रावेर पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी दिनकर हरिभाऊ सोनवणे यांनी सन 2014 ते 2018 या कालावधीत रावेर तालुक्यातील मांगी ग्रामपंचायत मध्ये प्रशासक काळात केलेल्या कमांची व आर्थिक व्यवहाराची आणि दप्तर दिरंगाई कायदा 2005 अन्वये कलम 10 (1) नुसार पंचायत समिती रावेर यांच्या विरूद्ध चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे .
विस्तार अधिकारी श्री सोनवणे यांच्याविरुद्ध वारंवार तक्रारी देऊन सुद्धा आज पावेतो कोणतीही चौकशी करून कारवाई करण्यात आलेली नाही म्हणून आज रोजी मनोहर सोनवणे यांनी दिनांक 01/11/2021रोजी रावेर पंचायत समिती समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे तरी महाशय मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे