अंतुर्ली तापीनदी तिरावरील पारंपारिक स्मशानभूमीच्या नूतनीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाहणी

अनामित
[ads id="ads2"]
मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे कार्यतत्पर आमदार मा.चंद्रकांत भाऊ पाटील यांचेशी नुकतीच जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री.एस.ए.भोईसर यांनी अंतूरलीं येथील तापीनदी तीरावरील पारंपारिक स्मशानभूमीचे नूतनीकरणाचे काम त्वरित झाले पाहिजे यासाठी चर्चा केली होती.
[ads id="ads1"]
 त्याची दखल घेऊन आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर सार्वजनिक बांधकाम उपविभाग खात्याचे शाखा अभियंता श्री शेजवळ व त्यांचे सहकारी यांना तात्काळ अंतूर्ली येथे सर्वे करण्यासाठी पाठवले व त्यासाठी कार्यकर्त्यांसमवेत स्मशानभूमीसाठी रस्ता, नदीकाठा जवळ उतरतांना पुलाचे बांधकाम तसेच नदीकाठी ओटे व इतर कामे झाली पाहिजेत तसेच गटार काढून गावातील सांडपाणी व्यवस्थित निघून रस्ता तयार करावा व रस्त्याच्या दुतर्फा झाडे,लाईट खांब लावणे व कंपाऊंड करून स्मशानभूमी त्वरित तयार करावी, सुशोभित स्मशानभूमी व्हावी अश्या नागरिकांनी सूचना मांडल्या. जुन्या स्मशान भूमी शेड ची दुरुस्ती करण्यात यावी. 

या सर्व सूचना अभियंत्यांनी नोंद करून घेतल्या, मोजमाप केले. लवकरच आराखडा तयार करून मंजुरीसाठी पाठवण्यात येईल व लवकरात लवकर कामास सुरुवात होईल आशा पल्लवित करण्यात आले.
             
याप्रसंगी एस.ए.भोई सर,दिनेश पाटील,शेख भैय्या शेख करीम, अनिल वाडीले ,नामदेव भोई ,श्री कांडेलकर, एस के तायडे ,शांताराम महाजन, बी.एस.वानखेडे, सुभाष सुर्यवंशी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!