रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे)रावेर तालुक्यातील पाल येथे मुलाने वडिलांसाठी उडदाची डाळ व भाकरी आणल्याच्या रागाच्या भरात वडिलांना मुलाने केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की ,रावेर तालुक्यातील पाल येथील मुलानेच संतापाच्या भरात वडिलांना केलेल्या मारहाण मध्ये वडिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे वडिलांनी जेवणासाठी उडदाची डाळ व भाकरी केल्याचा राग आल्यामुळे
[ads id="ads2"]
मुलाने वडिलांच्या डोक्यात माचल्याचा दांडका डोक्यात मारल्याने मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याप्रकरणी रावेर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी सशयीत मुलाला अटक केली आहे रावेर तालुक्यातील पाल येथे शेत शिवार गट नंबर 271मध्ये अनाज्या भारत्या बारेला वय वर्ष 75 हे कुटुंबासह राहत होते काल दि. २९ नोव्हेंबर सोमवारी रोजी संध्याकाळी त्यांनी मुलगा दिनेश उर्फ शिवा बारेला वय वर्ष 26 यास जेवण करून
[ads id="ads1"]
घेण्यास सांगितले त्यानंतर दिनेश ने काय स्वयंपाक केला असे विचारले असता जेवणात उडीद डाळ व भाकरी केली असल्याचे सांगितले याचा राग येऊन दिनेशने वडील व बहिनिस चापटा बुक्क्यांनी मारहाण केली वयस्कर वडील दिनेशच्या मारहाण पासून पळ काढत असताना दीनेशने याने लाकडी खाटेच्या मलच्याच्या दांडक्याने वडील आनाज्या यांच्या डोक्यात व तोंडावर तडाखा बसल्याने गंभीर दुखापत केल्याने अणाज्या चा मारहाणीत मृत्यू झाला बनाबाई नरसिंग बारेला यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस स्टेशनला गु.र.नं. ३९ २ / २०२१ भादवि कलम ३०२ , ३२३ , व ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास फैजपूर उपविभागाचे प्रभारी उपविभागीय अधिकारी विवेक लवांड व पोलीस निरीक्षक कैलास नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन नवले व पोलीस तपास करीत आहेत या खुनाचा घटनेची माहिती मिळताच फैजपूर उपविभागाचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लवांड सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक पोलीस उपनिरीक्षक मनोहर जाधव व पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तसेच आरोपी वडिलांना मारहाण केल्याने खून केला म्हणून सवशयीत आरोपी दिनेश यास अटक करण्यात आली आहे