प्रथम छत्रपती शिवाजी महाराज, शाहु महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला निरज जी सेठी,प्रा. संजय मोरे अण्णा आणि संगीता सोनवणे, किरण निजाई , यांनी पुष्पहार अर्पण केला. निरज जी सेठी प्रा संजय मोरे आणि सर्व शक्ती सेना कार्यकर्त्याच्या उपस्थिती मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाल्या बदल जितेंद्र शुंटी यांचा शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार करण्यात आला. [ads id="ads1"]
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन किरण निजाई सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, संगीता नरेंद्र सोनवणे सर्व शक्ती सेना महिला आघाडी, महाराष्ट्र उपाध्यक्ष, मायाताई मोरे सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य सल्लागार,महाराष्ट्र संदीप घोलप नशिक जिल्हा अध्यक्ष ,दिपक चौधरी सर्व शक्ती सेना नाशिक जिल्हा उपाध्यक्ष ,सावळे सर्व शक्ती सेना विद्यार्थी संघटना जळगाव जिल्हा अध्यक्ष,प्रवीण धुदले सर्व शक्ती सेना जळगाव जिल्हा प्रसिध्दी प्रमुख योगेश अहिरे हे होते.
त्या प्रसंगी प्रा संजय मोरे सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी संपुर्ण महाराष्ट्रात सर्व शक्ती सेनाचे संघठन मजबुत करण्या बाबत प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. संपुर्ण महाराष्ट्र सर्व शक्ती सेना मय करणारं असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात निरज जी सेठी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना खालील उदगार काढले. पद्मश्री पुरस्कार प्राप्त शहीद भगतसिंग सेवा दलाचे अध्यक्ष जितेंद्र सिंह शुंटी यांचे 'सामाजिक कार्य' श्रेणी अंतर्गत प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे आणि त्यांनी दिल्लीला विशेषत: अभिमानास्पद कार्य केले आहे.
जितेंद्रसिंग शुंटी हे गेल्या पंचवीस वर्षांपासून समाजसेवेच्या क्षेत्रात नावाजलेले नाव असून, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा विलक्षण विक्रम आहे. समाजातील गरजू आणि असहाय घटक. ते म्हणाले की, सध्या सुरू असलेल्या कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान, शॅन्टीने अनेक प्रकारे गरिबांना मदत केली आहे, तसेच रुग्णवाहिका चालवून मृतदेह आणणे आणि त्यांचे अंतिम संस्कार करणे, विशेषत: कोविड मृत्यूच्या बाबतीत. जितेंद्र सिंह शुंटी हे सर्वसामान्य लोकांसाठी आणि विशेषत: तरुणांसाठी एक मोठे प्रेरणास्थान बनले आहेत, ज्यांना या देशातील लोकांची, विशेषत: गरीब आणि गरजूंची सेवा करायची आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांनी जितेंद्रसिंग शुंटी यांना मानवतेची सेवा करण्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला नाशिकः,जळगाव, मयुर कोळी, कैलास दामोदरे,संदीप गाढे, राजेंद्र सपकाळे, दीपक वानखेडे, नितीन गवई, सचिन सुरवाडे, प्रा सुमीत पाटील, प्रा.सुनिल तायडे, सिकदर तडवी, विनोद ठाकरे, गोलु सूर्यवंशी, अशोक पाटील, विनोद पाटील, किशोर पाटील असंख्य कार्यकते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा सुनील तायडे यांनी केले तर आभार संदिप घोलप सर्व शक्ती सेना जिल्हा अध्यक्ष नाशिक यांनी मानले.