हिवाळी अधिवेशनात कोरोनाचा शिरकाव ; 32 जणांना लागण; कर्मचारी, पोलीस, पत्रकारांचा समावेश

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


मुंबई (समाधान गाढे) मुंबईत आणि राज्यात कोरोना आणि ओमायक्रोन रुग्णांचा आकडा काढत असताना एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत सुरू असणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास उपस्थित असणारे 32 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.[ads id="ads1"] 

यामध्ये पोलीस, पत्रकार, विधिमंडळ आणि मंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.[ads id="ads2"] 

  कोरोना आणि ओमायक्रोन व्हेरिएंटचा वाढता धोका लक्षात घेता कोरोना लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झाल्यावरही अधिवेशनास उपस्थित राहणारे मंत्री, आमदार यांच्यासह विधिमंडळ कर्मचारी, बंदोबस्तावरील पोलीस व पत्रकारांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. सर्व गोष्टींची खबरदारी घेऊनसुद्धा ज्या गोष्टीची भीती होती तीच घटना अखेर घडली आहे. अधिवेशनात अखेर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या 2400 जणांच्या कोरोना टेस्टमध्ये तब्बल 32 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

समीर मेघेंमुळे आमदार चिंतेत

विधिमंडळ अधिवेशनास उपस्थित असलेले भाजप आमदार समीर मेघे यांना कोरोनाची लागण झाल्याचे शनिवारी उघडकीस आले होते. मेघे यांनी स्वतःच फेसबुक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या आमदारांची तशीच प्रशासनाची चिंता वाढली आहे.

400 जणांचे अहवाल प्रतीक्षेत

अधिवेशनास उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. पहिल्या आठवडय़ात करण्यात आलेल्या चाचणीच्या वेळी आठ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते. दुसऱ्या आठवडय़ात अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी शनिवार-रविवारी कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 32 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 400 जणांचे अहवाल प्रतीक्षेत असून रात्री उशिरापर्यंत येणार आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!