रावेर प्रतिनिधी : रावेर शहरातील व तालुक्यातील तमाम बौद्ध उपासक व उपसिका यांना सूचित करण्यात येते की, दि. 6 डिसेंबर 2021 वार सोमवार रोजी महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन पर कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आलेले आहे. [ads id="ads1"]
तरी, सर्व बौद्ध उपासक व उपसिका यांनी पांढरे वस्त्र परिधान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या जवळ सकाळी ठीक 9.00 वाजता उपस्थित राहावे. असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा, रावेर व रावेर तालुका बौद्ध समाज यांचे मार्फत करण्यात आले आहे.