नायगाव ( ता. यावल ) येथील एका २२ वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध ठेवुन तरूणीस लग्न करण्यासाठी जिवे ठार मारण्याची धमकी देवुन विनयभंग करणाऱ्या जळगावच्या तरूणा विरूद्ध, तरुणीच्या फिर्यादीवरून यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads2"]
सविस्तर असे की, नायगाव तालुका यावल येथील राहणारी २२ वर्षीय तरुणी ही जळगाव येथे शिक्षणासाठी नातेवाईक राहत आहे. तिला शांताराम श्रावण ठाकुर (रा. शिरसोली ता. जि. जळगाव) या तरूणाने जुलै २०१८ ते २७ नोव्हेंबर २०२१ या कालावधी दरम्यान, जवळीक वाढवली. [ads id="ads1"]
जळगाव येथे क्लासेसला जात येत असतांना तिच्या घरी नायगाव येथे येवुन व जळगाव येथे वेळोवेळी प्रेमसंबंध ठेवुन जवळकी साधुन फिर्यादी तरुणीच्या घरी जावुन माझ्याशी लग्न कर अशी मागणी करून अट घातली व तू जर माझ्याशी लग्न केले नाही तर तुला व तुझ्या कुटुंबास जिवंत सोडणार नाही असा दम दिला. त्या वेळीस घाबरलेल्या तरूणीने शांताराम ठाकुर या तरूणा विरूद्ध यावल पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्याने पोलीसात भाग ५ गुरन२०३ / २०२१ भा .द .वी . ३५४ ( अ ) ५०६ , ५०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन , तपास पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे.