बनावट कागदपत्र तयार करून मनुदेवी संस्थानची फसवणूक केल्याप्रकरणी बाबा महाहंस महाराज यांच्यावर गुन्हा दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील सातपुडा निवासीनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानच्या जागा नसल्याचे भासवून बनावट कागदपत्र तयार करून नवीन ट्रस्टच्या नावाने जागा हडप करून संस्थानची फसवणूक करणाऱ्या बाबा महाहंस महाराज याला शुक्रवार ३ डिसेंबर रोजी सायंकाळी अटक केली असून यावल पोलीसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads2"]  

सातपुडा निवासीनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शांताराम राजाराम पाटील (वय-६२) रा. आडगाव ता. यावल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, प्रकाश मार्तंड पाटील उर्फ श्री बाबा महाहंस जी महाराज रा. आडगाव ता. यावल यांनी सातपुडा निवासीनी श्री. मुनदेवी मंदीर सेवा प्रतिष्ठान ही जागा वनविभागा कक्ष नं. १४९ गट नं. ३५३ मध्ये ०.२४ आर ही जागा ही वनविभागात येते. [ads id="ads1"]  

  परंतू बाबा महाहंस यांना जागा वनविभागाची असल्याचे माहिती असतांना बनावट दस्तऐवज तयार केले आणि ही जागा मंदीराची नसल्याचे दाखवून त्या ठिकाणी नवीन मुनदेवी चॅरिटेबल ट्रस्ट या नावाने नव्याने संस्था स्थापन करून फसवणूक केली. यासंदर्भात यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रार आणि न्यायालयाच्या आदेशान्वये संशयित आरोपी बाबा महाहंस महाराज यांच्यावर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात संशयित आरोपी बाबा महाहंस महाराज यांना अटक केली आहे.

मनूदेवी संस्थानचे सचिव निळकंठ डिगंबर चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वनविभागाच्या मालकीची जागा १९९१ पासून ही सातपुडा निवासीनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानच्या मंदीराच्या विकासासाठी ही ०.२४ आर जागा वनविभागाने दिली होती. याबाबत सर्व पुरावे व नोंदणी संदर्भात कागदपत्रे संस्थाकडे आहे. असे असतांना संशयित आरोपी बाबा महाहंस महाराज यांनी बनावट कागदपत्रे तयार करून नवीन मुनदेवी चॅरिटेबल स्ट्रस्ट नावाने संस्था स्थापन करून मनुदेवी संस्थानची फसवणूक केली असल्याचे सांगितले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!