गौण खनिजाची अवैध वाहतूक
करणाऱ्या वाहनांचा लिलाव.
रावेर प्रतिनिधी : रावेर महसूल विभागाने अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली जप्त केलेल्या यांचा 16 डिसेंबरला लिलाव करण्यात येईल.[ads id="ads2"]
इच्छुक व्यक्ती, संस्थांनी लिलावात भाग घ्यावा. लिलावातील अटी व शर्ती लिलावातील वाहने, लिलावात हातची किंमत इ. बाबत कार्यालयीन वेळेत तहसीलदार, रावेर यांच्याशी संपर्क साधावा, असे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.