यावल वार्ताहर (सुरेश पाटील)यावल तालुक्यात अंजाळे शिवारात काल दि.2 रोजी सर्कल आणि तलाठी यांनी संयुक्त कारवाई करीत 3 ब्रास खडीने भरलेले डंपर,आणि एक ब्रास डबर भरलेले ट्रॅक्टर अवैध अनाधिकृत कोणतेही परमिट न काढताना वाहतूक करताना आढळून आल्याने पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे
[ads id="ads2"]
.महसूल कर्मचार्यांनी पकडलेले हे दोघं वाहन मात्र एका अधिकाऱ्याने सोडून देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत कायदेशीर पळवाटा शोधल्या.याबाबत प्रांताधिकारी कैलास कडलक चौकशीअंती संबंधितांवर काय कारवाई करणार याकडे सुद्धा संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून आहे.
[ads id="ads1"] यावल तहसील कार्यक्षेत्रात तापी नदी किनारपट्टी परिसरात अवैध गौण खनिज उत्खनन करून खडी,गिट्टी,मुरूम,डबर, दगडाचा बारीक किस काही क्रशर चालक अवैध रित्या तसेच नाम मात्र परमिट काढून वाजवी पेक्षा जास्त प्रमाणात गौण खनिज उत्खनन करून दर महिन्याला कोट्यवधी रुपयांची कमाई करून घेत आहेत यात काही क्रशरवाले 30 हजार रुपया पासून तर 50 हजार रुपये मासिक हप्ता कोणाला देतात?आणि यांच्यावर कारवाई का होत नाही?याबाबत तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असले तरी काल दि. 2 डिसेंबर2021रोजी मंडळ अधिकारी जगताप,तलाठी सूर्यवंशी यांनी अवैध गौण खनिज वाहतूक करणारे एक डंपर आणि एक ट्रॅक्टर पकडून यावल पोलीस स्टेशनला जमा केले ते ट्रॅक्टर आणि डंपर सोडून देण्यासाठी एक अधिकारी कायदेशीर पळवाटा शोधून संबंधितांचे वाहन सोडून देण्याबाबत रात्री उशिरापर्यंत सातोद रोडवर चर्चा सुरू होती असे बोलले जात असून गौण खनिज प्रकरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की अंजाळे शिवारात वाहन मालक गणेश शिवाजी रावडे/पाटील आणि वाहन चालक महेंद्र कोळी यांचे ताब्यातील MH-19,BM-5180 या क्रमांकाच्या डंपर मध्ये 3 ब्रास खडी अवैध वाहतूक करताना तसेच MH-19,BJ-6551 या क्रमांकाच्या ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये 1 ब्रास डबर अवैध वाहतूक करताना आणि त्यांच्या जवळ कोणत्याही प्रकारचा गौण खनिज उत्खननाचा आणि वाहतुकीचा परवाना नसल्याने गौण खनिज वाहन पकडण्यात आले होते.संबंधित सर्कल आणि तलाठी यांनी रीतसर पंचनामा करून दोघं वाहन यावल पोलीस स्टेशनला काल दि.2 रोजी दुपारीच जमा केले होते.तरी या दोघ वाहन चालक मालकांकडून महसूल विभागाने काय दंडात्मक कारवाई केली? किंवा या वाहन चालक मालकांकडून कोणतेही चलन न फाडता कायदेशीर दंडात्मक कारवाई न करता ते अवैध गौण खनिज वाहतूक करणारी वाहने कोणी आणि का कोणत्या नियमानुसार सोडून दिली याबाबतची चौकशी प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी आपल्या महसूल यंत्रणेमार्फत तात्काळ करावी असे तालुक्यात बोलले जात असून यावल तालुक्यातील काही मंडळ अधिकारी आणि सर्कल अवैध गौण खनिजाची व आणि पकडून आणल्यानंतर संबंधित काही अधिकारी कर्मचारी ती वाहने का सोडून देत आहेत याची सुद्धा प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन चौकशी कारवाई तसेच आतापर्यंत यांनी किती ब्रास गौण खनिज उत्खनन केले याचे मोजमाप पंचनामा करून तसेच गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांनी प्रत्यक्षात शासन दरबारी किती रॉयल्टी भरली याची सखोल चौकशी जिल्हाधिकारी जळगाव आणि उपविभागीय अधिकारी यांनी करावी असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.