Jalgaon : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी गुलाबराव देवकर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


जळगाव प्रतिनिधी (सिद्धार्थ ठाकणे) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांची वर्णी लागली आहे. तसेच उपाध्यक्षपदी शिवसेनेचे शामकांत सोनवणे यांची निवड झाली आहे.[ads id="ads1"]  

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महा विकास आघाडीने दणदणीत विजय संपादित केला होता. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा समान वाटावा हवा असल्याने गेल्या काही दिवसांपासून बैठका सुरू होत्या. [ads id="ads2"]  

  गुरुवारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थित पदाचा फॉर्मुला निश्चित करण्यात आला होता. २० महिन्यांचा फॉर्म्युला खंडित करीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेने अध्यक्षपद ठेवले तर उपाध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!