चुईंगमने घेतला शालेय विद्यार्थ्याचा बळी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

भडगाव तालुक्यातील एका नववीच्या विद्यार्थ्याच्या श्वसननलिकेत च्युईगम अडकल्यामुळे त्याचा करुण अंत झाल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.[ads id="ads2"]  

उमेश गणेश पाटील (१५, पांढरद ता. भडगाव) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

भडगाव तालुक्यातील पांढरद येथील रहिवासी असलेला उमेश गणेश पाटील हा भडगाव येथील लाडकुबाई विद्यामंदिर या शाळेत इयत्ता नववीत शिकत होता.[ads id="ads1"]  

गुरुवारी शाळा सुटल्यानंतर त्याने चुईंगम घेतली आणि गावी जाण्यासाठी रिक्षात बसला. च्युइंगम त्याच्या श्वासनलिकेत अडकल्याने त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याला तात्काळ भडगाव येथे खाजगी दवाखान्यात आणण्यात आले.

तेथील डॉक्टरांनी त्याला पाचोरा येथे घेऊन जाण्यास सांगितले. त्याला पाचोरा येथे नेत असतानाच वाटेतच त्याची प्राणज्योत मालविली. गुरुवारी त्याचा गणिताचा पेपर होता. त्याने परीक्षा दिली. दुपारी च्युइंगम चघळत असतानाच हा प्रकार घडल्याचे शाळेच्या सूत्रांनी सांगितले.

उमेश याचे वडील गणेश पाटील हे शेतकरी आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!