रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)
रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे विकास अवसरमल (जिल्हा अध्यक्ष अनु जाती मोर्चा, जळगांव ग्रामीण)यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकारी पदाधिकारी मा विनोद वाघोदे(रावेर लोकसभा मतदार क्षेत्र मीडिया प्रमुख),मा प्रशांत निकम सरचिटणीस, मा बाविस्कर जिल्हा उपाध्यक्ष, सर्व जिल्हा पदाधिकारी सह फिरविण्यात आलेल्या संविधान रथाची सांगता मौजे ऐनपूर ता रावेर जिल्हा जळगांव येथे करण्यात आली.[ads id="ads1"]
समारोप कार्यक्रम मा सुरेश भाऊ धनके जेष्ठ नेते भा ज पा, हे अध्यक्ष होते तर मा श्री नितिन मोरे, प्रदेश अध्यक्ष जयभीम आर्मी, हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. मा नितीन मोरे यांनी आपल्या 45 मिनिटे चाललेल्या भाषणात संविधानाचे महत्त्व काय,. अध्यक्ष सुरेश धनके यांनी देखील सखोल मार्गदर्शन केले.[ads id="ads2"]
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा वासु नरवाडे यांनी तर आभार मा विनोद वाघोदे यांनी मानले. मा विकास भाऊ यांच्या संकल्पना विषयी सर्वांनी त्यांचे खूप कौतुक केले, भविष्यात अशाच नवनवीन संकल्पना सादर करून पक्षाचे ध्येय धोरण देशातील जनतेला निदर्शनास आणून देऊ असे मा अवसरमल यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले. समारोप कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. सभा संपल्यावर मा नितीन मोरे प्रदेश अध्यक्ष यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले.

