रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)
यावल तालुक्यातील मारुळ येथील शेकडो युवक कार्यकर्त्यांनी व महिलांनी प्रहार जनशक्ती पार्टी मध्ये प्रवेश घेतला असून इतर सर्व पक्षांचा अनुभव घेतला असता न्यायिक वागणूक न मिळाल्यामुळे सन्मानाचे राजकारण करण्यासाठी आपण प्रहार मध्ये प्रवेश करीत असल्याचे कार्यकर्त्यांनी व महिलांनी सांगितले.. [ads id="ads2"]
या वेळी अनिलभाऊ चौधरी म्हणाले आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या विचारांवर विश्वास ठेवून तळागळातल्या लोकांना न्याय देण्यासाठी सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय देण्यासाठी प्रहार जनशक्ती पार्टी हा एकमेव पक्ष सक्षम आहे, त्यासाठी सर्व महिला, युवक प्रहार जनशक्ती पार्टी मध्ये प्रवेश करीत आहेत असे उद्गार यावेळी अनिल चौधरी यांनी केले. आजच्या बैठकीमध्ये पुढे येऊ घातलेल्या निवडणुका संदर्भात चर्चा करून पक्षाचे ध्येयधोरण आदेश सर्वांनी मान्य करायचा असा एकमतठराव आपण सर्वानी करावे हि नवीन कार्यकर्त्यांनी सूचना दिल्या..
यावल तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.