रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)
दि.२ नोव्हेंबर गुरुवार रोजी जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात केळी विकास महामंडळाच्या स्थापने संदर्भात जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.यावेळी जिल्ह्यातुन केळी उत्पादक, कृषितज्ञ ,कृषी अधिकारी,केळी निर्यातदार आदी उपस्थित होते.[ads id="ads2"]
यावेळी जळगाव जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत साहेब यांना तांदलवाडी येथील निसर्गराजा कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री शशांकभाऊ पाटील यांनी जी आय मानांकन असलेले पुस्तक भेट दिले.केळी निर्यात ,स्थानिक बाजारपेठ,ब्रँडिंग,आदीं . संदर्भात चर्चेत सहभाग घेतला.यावेळी सुनिलभाऊ कोंडे,श्री राजीव भोगे,कोचुर येथील श्री केतन पाटील यांसह मान्यवर केळी उत्पादक उपस्थित होते.