25 हजारांची लाच घेताना तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

नागपूर : भद्रावती तहसीलदार डॉ.नीलेश निवृत्ती खटके (36) 25 हजारांची लाच स्वीकारताच तहसील कार्यालयात शनिवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.[ads id="ads1"] 

तहसीलदारांकडून एक लाखांच्या लाचेची मागणी

तक्रारदार चंद्रपूर जिल्ह्यातील चिरादेवी सुठाणा (ता. भद्रावती) येथील रहिवासी आहे. त्यांचा विटाभट्टीचा व्यवसाय आहे. त्यासाठी त्यांना स्वताच्या शेतातून 300 ब्रास मातीचे उत्खनन करायचे होते. [ads id="ads2"] 

  त्याकरिता यांनी भद्रावती तहसील कार्यालयात रितसर अर्ज करून रॉयल्टी तसेच अन्य शासकीय शुल्कापोटी 88, 256 रुपये जमा केले होते. त्यानंतर त्यांनी तहसीलदार नीलेश निवृत्ती खटके यांची भेट घेऊन मातीच्या उत्खनन आणि वाहतुकीच्या परवान्याची मागणी केली. हा परवाना देण्यासाठी तहसीलदार खटके यांनी एक लाख रुपयांची लाच मागितली व 25 हजारांवर तडजोड झाली. ही लाच द्यायची नसल्याने वीटभट्टीधारकाने थेट नागपूर येथील एसीबीच्या कार्यालयात धाव घेतली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!