तरी काही लोकांनी उकिरडे तयार केलेला आहे असे असता शासनाने नुकतेच घरकुल बाबत ड यादी प्रसिद्ध केलेले असून त्यात कित्येक गरजू लोकांची नावे समाविष्ट आहे मात्र त्यांच्याकडे स्वतःची जागा उपलब्ध नाही त्यामुळे सर्वांसाठी पक्के घर असे शासनाचे धोरण असून मात्र गरजू लाभार्थ्यांना त्याचा फायदा होत नसल्याने शासनाचे धोरण कुचकामी ठरत आहे.[ads id="ads2"]
मोरगाव बुद्रुक तालुका रावेर येथील कोणते एकाच जातीचे नागरिकांना प्राधान्य न देता संपूर्ण मोरगाव बुद्रुक येथील जे लोक खरोखर गरजू आहे त्यांच्याकडे स्वतःची जागा नाही अशांना त्वरीत अतिक्रमण काढून या मागणीसाठी रावेर पंचायत समिती,रावेर समोर एक दिवसीय धरणे आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे तर्फे करण्यात येत आहे.
हेही वाचा :- अॅपेरिक्षे-दुचाकीच्या धडकेत सहाय्यक तलाठ्यासह तीन जण जखमी
राजूभाऊ सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष आर पी आय यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष विकी तायडे, विनोद तायडे,किरण देवरे,शेख इक्बाल,समाधान गाढे, राहुल लहासे,शेख मुस्ताक,दिपक गाढे, कमलाकर गाढे, भिमराव तायडे यांच्या नेतृत्वात सदर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.आणि पंचायत समिती रावेर येथे गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांना आर.पी.आय.तर्फे निवेदन देण्यात आले यावेळी आर. पी.आय.कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

