तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावणारे देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार पार पडलेत. दिग्गज नेतेमंडळींनी बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिली. [ads id="ads1"]
नेपाळ, भुतान, बांगलादेश, श्रीलंकाचे सेनादल प्रमुखही यावेळी उपस्थित होते. जनरल बिपीन रावत यांना अखेरचा सलाम देण्यात आला आहे. यावेळी लष्कराने 17 तोफांची सलामी दिली आहे.[ads id="ads2"]
ब्रार स्क्वॉयर येथे 800 सैनिक तैनात होते. यात 800 सैनिकांमध्ये वायूसेना, नौदल आणि लष्कराचा समावेश आहे. तर तीनही सेना दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांना आदरांजली वाहिली आणि त्यानंतर , 800 सैनिकांकडूनही मानवंदना वाहिली. या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही सेना दलांचे प्रमुख उपस्थित होते.
Delhi: CDS General Bipin Rawat and his wife Madhulika Rawat were laid to rest on the same pyre for cremation. The two lost their life in #TamilNaduChopperCrash.
— ANI (@ANI) December 10, 2021
Their daughters Kritika and Tarini performed their last rites. pic.twitter.com/druF5Vim46

