भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) भुसावळ तालुक्यातील जडगाव-वरणगाव रोडवर धावत्या इंडिका कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.[ads id="ads1"]
मात्र, या आगीत इंडिका कार संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. कारमधून ड्रायव्हर एकटाच प्रवास करत होता. कार ने पेट घेतल्याचे चालकाच्या निदर्शनास आल्यावर तो तात्काळ गाडीतून खाली उतरला आणि मोठी त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव जळगाव रोडवर काही दिवसापासून बंद अवस्थेत ही इंडिका कार होती.[ads id="ads2"]
कारचे मालक ईश्वर सपकाळे ही इंडिका कार आपल्या स्वतःच्या घरी घेऊन जात होते. त्यांनी गाडी सुरू केली आणि काही किलोमीटरचा पल्लाही गाठला. मात्र, प्रवासा-दरम्यान गाडीने अचानक पेट घेतला. गाडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच त्यांनी गाडी थांबवली आणि गाडीतून खाली उतरले.

