रावेर प्रतिनिधी (सिद्धार्थ ठाकणे)आज 5 डिसेंबर जागतिक मृदा दिन असल्या कारणाने रावेर तालुका कृषी विभागातर्फे अभोडे बुद्रुक येथे जागतिक मृदा दिन साजरा करत असताना कृषी पर्यवेक्षक रावेर -१ या पदावर कार्यरत असलेले एन. व्हि. रूले यांचा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना तात्काळ रावेर येथील श्रीपाद हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता तेथील डॉ. यांनी त्यांना मृत घोषित केले.त्यांच्या जाण्याने रावेर परिसरातून शोक व्यक्त होत आहे. [ads id="ads1"]
रावेर येथील तालुका कृषी कार्यालय येथे सध्या ३०% च स्टाफ आहे. त्यामुळे अतिरिक्त कामाचा ताण त्यांचे वर बऱ्याच वर्षापासून पदभार सांभाळायचे. [ads id="ads1"]
कामाच्या व्यापाने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला असे सर्व कर्मचारी वर्गातून बोलले जात आहे. शासन रिक्त पदे कधी भरणार ? कित्येक लोकांचा जीव गेल्यावर रीक्त पदे भरली जाणार ? असा संतप्त सवाल सुवर्ण दिप न्यूज विचारत आहे.

