रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात My Lifestyle Marketing कंपनीच्या प्रतिनिधी बैठकीत महापुरुषांचा अवमान मराठा सेवा संघ व संभाजी बिग्रेड च्या वतीने रावेर पोलीसात तक्रार दाखल

अनामित
रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) १ डिसें. दुपारी १२ च्या दरम्यान रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात माय लाईफस्टाईल मार्केटीग कंपनी च्या प्रतिनीधी यांची बैठक होती, त्यात चक्क त्यांनी आपले कोणतेही भान न राखता अख्या देशाचे 'महाराष्ट्राचे दैवत' असणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सभागृहात असणाऱ्या महाराज्यांच्या राज्यभिषेक सोहळ्याच्या तैल चित्रावरच कंपनीने आपल्या कंपनीचे बॅनर लावल्याचे दिसुन आले 
[ads id="ads2"]
सदरहून त्यांनी एक प्रकारे सर्व शिवप्रेमी तसेच जनमाणसाच्या भावना दुखविण्याचा प्रकार केला असुन रावेर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली. संभाजी बिग्रेड चे रावेर तालुका अध्यक्ष विनोद चौधरी संभाजी ब्रिगेड रावेर शहर अध्यक्ष मोरेश्वर सुरवाडे, योगेश महाजन, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, सोपान पाटील, किशोर पाटील , गणेश चौधरी, घनश्याम पाटील, तसेच संघटनेच्या माध्यमातून ह्या कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे तर मराठा सेवा संघाचे प्रशांत पाटील व संभाजी बिग्रेड चे विनोद चौधरी यांनी सांगीतले की कंपनीने केले हे कार्य अशोभनीय आहे त्यांना माफी नाही तात्काळ गुुन्हा दाखल व्हावा संबधीत कंपनी व व्यक्तीवर गुन्हा दाखल न झाल्यास दोघ संघटना गनिमी काव्याने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला तर रावेर PI यांनी संबधीत कंपनीवर व व्यक्तीनं वर योग्य ती कारवाई होईलच यात शंकाच नाही केलेला हा प्रकार निंदनीय असुन शासनाच्या नियमानुसार कारवाई होईलच असे PI कैलाश नांगरे यांनी सर्व शिवप्रेमी यांना सांगीतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री उशिरापर्यंत दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीआय कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शितल कुमार नाईक नाईक करीत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!