महिला सरपंच, सदस्य सक्षम आहेत, सभागृहात पती चालत नाही; प्रभाकर सोनवणे , सर्वपक्षीय सरपंच परिषदेस उत्तम प्रतिसाद.

अनामित
यावल वार्ताहर (सुरेश पाटील) ग्रामपंचायत,पंचायत समिती, जिल्हा परिषद व इतर अनेक संस्थांमध्ये महिला सक्षम झालेल्या आहेत यांच्या काही सदस्यांचे/सरपंच यांचे पती महाशय प्रत्यक्ष सभागृहात थांबू शकत नाही किंवा चालत नाहीत. 
[ads id="ads2"]
आणि नवीन महिला सदस्य सक्षम होण्यासाठी सदस्य सरपंच यांनी स्वतः सभागृहात उपस्थित राहून आपल्या कामकाजाची माहिती करून घ्यावी असे मार्गदर्शन राज्यस्तरीय जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोशियन जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांनी केले.
[ads id="ads1"]
       यावल येथील यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ सभागृहात गुरुवार दि.2 डिसेंबर 2021रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद मुंबई,(यावल तालुका) बैठकीत ते बोलत होते,आजच्या या सरपंच परिषदेत यावल तालुक्यातून सर्व समाजातुन निवडून आलेले सर्व पक्षीय महिला,पुरुष सरपंच उपस्थित आहेत यात सर्वांनी आपले राजकीय पक्षाचे ध्येय उद्दिष्ट बाजूला ठेवून उपस्थिती दिली आहे सरपंच सदस्यांनी ग्रामपंचायत,पंचायत समिती जिल्हा परिषद नियमाचे वाचन करून अभ्यास करावा जेणेकरून प्रत्यक्ष ग्रामपंचायत कारभार सांभाळताना त्याचा मोठा फायदा होत असतो पूर्ण अभ्यास असल्याने ग्रामसेवक,गटविकास अधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा तुम्हाला कायदेशीर कामासाठी थांबवू शकत नाही.
         बोलल्या शिवाय आणि काही मागितल्याशिवाय सरकार काहीही देत नाही त्यासाठी उदाहरण देऊन विकास कामासाठी नेहमी आवाज काढावा लागेल.यावल तालुक्यातील सरपंच यावल पंचायत समिती कार्यालयात विविध कामानिमित्त आले असतात त्यांना पंचायत समिती आवारातील पारावर ताटकळत बसावे लागते ऊन पाऊस याचा त्रास सहन करावा लागतो ही समस्या लक्षात घेता यावल पंचायत समिती,जिल्हा परिषद असोसिएशनचे तालुकाध्यक्ष शेखर पाटील यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत तालुक्यातील सरपंच यांच्या बैठकीसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध होण्यासाठी एक ठराव केला आहे.त्यानुसार सरपंचा साठी एक स्वतंत्र कक्ष लवकरच उपलब्ध होईल अशी माहिती सुद्धा प्रभाकर सोनवणे यांनी दिली.
ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचे फिरते चाक आहे कारण ग्रामसेवक हा ग्रामपंचायत मध्ये जिकडे बहुमत आहे त्या बाजूनेच कामकाज करीत असतो अशी सुद्धा जाणीव उपस्थित सरपंच यांना करून दिली.
        यावेळी प्रामुख्याने जिल्हा परिषद चे जिल्हाध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे,सरपंच परिषद जिल्हा समन्वयक बाळू धुमाळ,बाळू चव्हाण,युवराज पाटील,बाजार समितीचे माजी सभापती नितीन चौधरी,पं.स.गटनेते शेखर पाटील,दहिगावचे उपसरपंच किशोर महाजन,दहिगाव सरपंच अजय अडकमोल,प्रसिद्धी प्रमुख कोरपावली सरपंच विलास अडकमोल,उपाध्यक्ष किनगाव बु.सरपंच भूषण पाटील,उपाध्यक्ष मारुळ सरपंच असद सय्येद,महिला तालुका अध्यक्ष हंबर्डी सरपंच अलकाताई पाटील, किनगाव खु सरपंच पती संजय पाटील,मोहराळे सरपंच नंदा महाजन,महेलखेडी सरपंच शरिफा तडवी,बामणोद सरपंच राहुल तायडे,बोरखेडा सरपंच राजेश तलेले,कोळन्हावी सरपंच विकास सोळखे,अंजाळे सरपंच यशवंत सपकाळे,पिंपरुड सरपंच योगेश कोळी,अट्रावल सरपंच मोहन बाविस्कर,मनवेल सरपंच जयसिंग सोनवणे,शिरसाड सरपंच दीपक इंगळे,वड्री सरपंच अजय भालेराव,भालोद सरपंच प्रदीप कोळी,भालशिव सरपंच,कोळवद सरपंच याकूब तडवी,आमोदे सरपंच हसीना तडवी,इत्यादी तालुक्यातील 50 सरपंच 34 उपसरपंच सहित 200 च्या वर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यात जळगाव जिल्हा परिषद एक नंबर

जळगाव जिल्हा परिषद मध्ये एकूण 67 सदस्यांपैकी म्हणजे 50 टक्के पेक्षा जास्त 37 महिला जिल्हा परिषद सदस्य आहेत कोणतेही राजकारण न करता सर्वपक्षीय सदस्य विकास कामे करीत आहेत.महाराष्ट्र राज्यात सर्वात प्रथम जळगाव जिल्हा परिषद मध्ये जिल्ह्यातील सरपंच परिषदेला एक स्वतंत्र रूम देण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यात सर्वात चांगले काम यावल पंचायत समिती मार्फत यावल तालुक्यात सुरू आहे, राजकारण विरहित सरपंच संघटना तयार झाल्याने तसेच नवीन कार्यकारणी मुळे सरपंच संघटनेचे कामकाज सुरळीत होणार आहे ग्रामपंचायत मध्ये आपले अधिकार कसे वापरायचे आहेत अडचणीतून मार्ग कसा काढायचा याबाबत कोणालाही राजकीय पक्ष न विचारता ग्रामस्थांच्या विकासासाठी काम करीत असतो सरपंच संघटनेमुळे सामाजिक आपूलकी जोपासली जाणार असल्याची माहिती पंचायत समिती जिल्हा परिषद असोशियन चे तालुकाध्यक्ष शेखर पाटील यांनी दिली.
          यावल तालुका सरपंच परिषद बैठकीत तालुक्यातील अनेक महिला सरपंच तसेच बहुसंख्य युवक तरुण सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंच परिषदेसाठी वढोदा ग्रामपंचायत सरपंच संदीप उर्फ भैय्या सोनवणे यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते बैठकीत सरपंच परिषदेचे प्रमुख श्रीकांत यांनी अमोल असे मार्गदर्शन करून संघटनेतील सर्व सरपंच सदस्यांचे तक्रारीचे व आवश्यक कामाबाबत शासकीय स्तरावर पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन श्रीकांत यांनी दिले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!