चिनावल प्रतिनिधी (किरण भालेराव) कोरोना प्रतिबंंधक लसीकरणाला वेग देण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘हर घर दस्तक’ माेहिमेंतर्गत घरोघरी मोफत लसीकरण करण्यात येत आहे. त्यात वैद्यकीय पथके नागरिकांचे लसीकरण करत आहेत.[ads id="ads1"]
ज्यांनी एकच डोस घेतला किंवा दोन्ही डोस घेतले नाहीत अशा नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येत आहे. विशेष पथके ज्यांचे लसीकरण बाकी आहे त्यांना लस देत आहेत. या पथकांमध्ये शिक्षक, आशा वर्कर व गट प्रवर्तक आदींचा समावेश करण्यात आला आहे. [ads id="ads2"]
त्यांनी घरोघरी जाऊन लोकांना लसीकरणाविषयी माहिती दिली व ज्यांचे लसीकरण बाकी असेल त्यांना लस घेण्यासाठी प्रवृत्त केले. लोकांच्या सोयीसाठी जिल्हा परिषद उर्दू शाळेत व प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन बैठ्या पथकांसह एक फिरते पथकही तयार केले होते. येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. हेमंत शर्मा, आरोग्य सेवक एस. आर. ठाकूर, समुदाय आरोग्य अधिकारी रितेश पाटील, आरोग्य सेविका मीनाक्षी हातेकर, निकिता जोगी, गट प्रवर्तक शैला नेमाडे, फार्मासिस्ट पंकज साळुंखे व आशा वर्कर ज्योती कोल्हे, वंदना वाणी व हलीमा तडवी यांचे सहकार्य लाभत आहे.

