रावेर येथे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



रावेर प्रतिनिधी (समाधान गाढे)  आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरात काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.[ads id="ads1"] 

रावेरात कॉंग्रेस पक्षाचा मोचक्याच कार्यकर्तेंच्या उपस्थितीत मेळावा संपन्न झाला. मेळाव्याला उशिरा उपस्थितीत राहिल्या बद्दल कॉग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी उपस्थितांची माफी व दिलगिरी व्यतीरीक्त जास्त बोलले नाही रावेरात पुन्हा लवकरच हजारोंच्या उपस्थितीत मेळावा घेण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थित पदाधिका-यांना दिले.[ads id="ads2"] 

यावेळी मेळाव्यात आमदार शिरीष चौधरी म्हणाले की, आगामी काळात कॉंग्रेस पक्षाच्या सुरु होणाऱ्या सदस्य मोहीममध्ये जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन मेळाव्याप्रसंगी त्यांनी केले. यावेळी कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष योग्रेंद पाटील, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी, माजी जिल्हाध्यक्ष राजिव पाटील, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, कॉंग्रेस शहर उपाध्यक्ष संतोष पाटील, राजु सवर्णे, डॉ. राजेंद्र पाटील, मानसी पवार, प्रतिभा मोरे, माजी जि. प. सदस्य कोकीळा पाटील,आदिवासी नेते दिलरुबाब तडवी, सावन मेढे, नगरसेवक जगदीश घेटे, मुबारक तडवी, सौद शेख, यशवंत धनके, सुरेश पाटील, आर. एल. पाटील, अॅड. योगेश पाटील,धुमा तायडे यांचेसह आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!