भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ अंतर्गत विविध विकास कामांसंदर्भात डीआरएम कार्यालय, भुसावळ येथे खा.रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत खा.रक्षा खडसेसह भुसावळ विधानसभा आमदार श्री.संजय सावकारे उपस्थित होते. [ads id="ads1"]
सदर बैठकीत पाचोरा-जामनेर रेल्वे ट्रक बोदवड स्टेशन पर्यंत वाढविणे बाबतच्या डीपीआर वर चर्चा करण्यात आली, रेल्वे मंत्रालयाने भुसावळ मंडळ अंतर्गत प्रस्तावित केलेल्या विविध प्रकल्पाच्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला.[ads id="ads2"]
भुसावळ मंडळ अंतर्गत असलेल्या रेल्वे गेट जवळील नव्याने बनविण्यात येणाऱ्या पुलांच्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला, भुसावळ स्टेशन येथे पेंडिंग असलेल्या विविध विकास कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला, तसेच रावेर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे संबंधीच्या तसेच रेल्वेच्या इतर कामांचा आढावा घेऊन, सदर कामे तत्काळ मार्गी लावणे संबधी डीआरएम एस एस केडिया तथा रेल्वे अधिकाऱ्यांना सुचना केल्या. तसेच आपल्या स्तरावरून रेल्वे मंत्रालयास कोणकोणत्या बाबींचा पाठपुरावा करावा याबाबत विचारणा केली.
यावेळी खा.रक्षा खडसेसह आमदार श्री.संजय सावकारे, भाजपा भुसावळ शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे, भाजयुमो शहराध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, भुसावल विभाग डीआरएम एस एस केडिया, एडीआरएम नवीन पाटील, सीनियर डीसीएम युवराज पाटील, एडीआरएम रुकमन मीनार व संबंधित रेल्वे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

