या बैठकीत 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने दि. ३ जानेवारी २०२२ सोमवार रोजी संध्याकाळी ६.३० वाजता प्रसिद्ध कथाकथनकार प्रा. व.पु.होले सावदा यांचे जाहीर ' व्याख्यान आयोजित करण्याचे ठरविण्यात आले.[ads id="ads2"]
तसेच तालुका व परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान पाच महिलांना 'सावित्रीच्या लेकी' हा जीवन गौरव पुरस्कार २०२१ गतवर्षाप्रमाणे यंदाही याच कार्यक्रमात देण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठक अध्यक्षस्थानी महासंघाच्या जिल्हाकार्याध्यक्षा शकुंतला रमेश महाजन होत्या. यावेळी व्याख्यानाचे प्रायोजकत्व कै. जीवन नामदेव महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मनिष जीवन महाजन रावेर यांनी स्वीकारले.
हेही वाचा :- डीआरएम भुसावळ येथे खा.रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न
बैठकीस मार्गदर्शक कांतीलाल महाजन, श्रीराम महाजन, रामकृष्ण महाजन, श्यामराव चौधरी, अतुल महाजन, दिनेश महाजन, योगेश मानकर, गणेश महाजन, मनोहर महाजन, लारा महाजन, युवाअध्यक्ष प्रकाश महाजन, पिंटू महाजन, विमलबाई महाजन, गंगाबाई महाजन, सुमित्राबाई महाजन, प्रमिला महाजन, उषा महाजन, छाया महाजन, आशाबाई महाजन आदी उपस्थित होते.


