कोरेगाव भिमा जयस्तंभ परिसरास अतिरिक्त पोलीस महासंचालकांची भेट

निनावी
पुणे - जिल्ह्यातील कोरेगाव भिमा नजीक पेरणे फाटा येथील ऐतिहासिक जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या ठिकाणास राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आशुतोष डुंबरे तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भेट दिली.
[ads id="ads2"]
यावेळी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी उभारण्यात आलेल्या सुविधांची पाहणी करण्यात आली. येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि  एकाच वेळी मोठी गर्दी होणार नाही अशा प्रकारे दर्शन रांगांचे नियोजन करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

यावेळी पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदी अधिकारी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!