धुळे वनवृत्त धुळे वनसंरक्षक आज यावल वनक्षेत्रात.
यावल वार्ताहर (सुरेश पाटील) धुळे वनवृत्त विभाग धुळे विभागाचे वनसंरक्षक दिगंबर पगार हे आज गुरुवार दि.9रोजी दुपारी यावल वनक्षेत्र कार्यालयात वनक्षेत्रातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी येत असल्याचे खात्रीशीर वृत्त असून या विभागात म्हणजे रावेर, यावल,चोपडा तालुक्यात अनेक वन अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याने वनविभागाच्या कामकाजावर विपरीत परिणाम झालेला असून शासकीय कर्तव्याबाबत दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे.
[ads id="ads2"]
धुळे वनवृत्त धुळे विभाग वन संरक्षक दिगंबर पगार हे आज यावल येथे वन विभाग कार्यालयात कार्यालयीन तसेच वनक्षेत्राचा आढावा माहिती घेण्यासाठी येत आहे यात विशेष करून सातपुडा वन क्षेत्रातील अतिक्रमणाबाबत वनक्षेत्रपाल व वन कर्मचारी यांच्याशी चर्चा करणार आहेत यावल पश्चिम, रावेर,चोपडा,अडावद,देवगिरी इत्यादी ठिकाणी वनक्षेत्रपाल नसल्याने तसेच प्रभारी एका वनक्षेत्रपालाकडे कार्यभार असल्याने एवढ्या मोठ्या विस्तीर्ण वनक्षेत्राचा कार्यभारावर नियंत्रण ठेवण्याचे आणि कामकाज पाहण्याची कुवत आणि कार्यक्षमते बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सातपुड्यात सागवानी व इतर मौल्यवान वृक्षांची अवैध तोड करून मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे संबंधित विभागाचे वनक्षेत्रपाल,गस्ती पथक प्रमुख यांच्या कामकाजाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे सातपुड्यातील सागवानी व इतर लाकडाची तोड करून तस्करी करणाऱ्यांविरुद्ध काय कारवाई होते किंवा नाही याची माहिती प्रसिद्धीमाध्यमांना सुद्धा मिळत नसल्याने अनेक प्रकरणे गुलदस्त्यात दडपून असल्याने तसेच गेल्या आठवड्यात रावेर वन विभाग अधिकाऱ्यांची भ्रमणध्वनी वरील चर्चा संपूर्ण जळगाव जिल्ह्यात पसरल्याने धुळे वनवृत्त विभाग दिगंबर पगार यांनी सखोल चौकशी करावी आणि अशी मागणी यावल रावेर चोपडा तालुक्यातून सर्व स्तरातून होत आहे.
