रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)
रावेर आगारातील 331 कर्मचारी गेल्या 7 नोव्हेबर पासुन बेमुदत संपावर आहे. आता पर्यंत 25 कर्मचारी यांचे निलंबन झालेले असून 6 कर्मचार्यांची सेवा समाप्ती केल्यामुळे कर्मचारी भयभीत झालेले आहेत.
[ads id="ads2"] निलंबनाच्या आदेशाने चालक राहुल विश्वनाथ कोळी यांना गेल्या 8 दिवसापुर्वी निलंबनाचे आदेश जे.पी.जंजाळ डेपो व्यवस्थापक यांनी दिले होते. त्याचा धसका घेवुन त्यांनी आज दि.९ डिसेंबर गुरुवार रोजी डेपो मध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. डेपोमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडल्याने त्याला वेळीच ग्रामीण रुग्णालयात एस.टी. ने घेवुन गेले त्यांचेवर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. अनिकेत चव्हाण यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव येथे पाठवित आले आहे.

