विवरा प्रतिनिधी (समाधान गाढे) निंभोरा (ता.रावेर) येथे शेतात असलेले ट्रान्स्फॉर्मर अज्ञात इसमाने फोडून ऑईल व बुशिंग चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे महावितरण कंपनीचे ३० हजारांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.या प्रकरणी महावितरणचे सहाय्यक अभियंता किनगे यांच्या फिर्यादीवरून येथील पोलिसांत अज्ञात चाेरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads1"]
सविस्तर असे की, रावेर तालुक्यातील निंभोरा येथील विवरे शिवारातील गोपाळ जगन्नाथ बऱ्हाटे यांच्या शेतात असलेले ट्रान्स्फॉर्मर अज्ञात इसमाने फोडून ऑईल व बुशिंग चोरून नेला. यामुळे महावितरण कंपनीचे अंदाजे ३० हजारांचे नुकसान केले. [ads id="ads2"]
या प्रकरणी येथील पोलिसांत येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता किनगे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चाेरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील व सहकारी करत आहेत.
दरम्यान, या आधीही एक दिवसापूर्वी याच शिवारात ट्रान्स्फॉर्मर फोडून खाली टाकून नुकसान केले होते. त्यातच आता या ठिकाणी ट्रान्सफाॅर्मर बसवण्यासाठी शेतकऱ्यांकडून वीज बिल भरल्याशिवाय ट्रान्स्फॉर्मर मिळणार नसल्याने शेतकऱ्यांची कुचंबणा हाेत आहे.

