रावेर(सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दिनांक 19.12.2021 रोजी निळे निशाण सामाजिक संघटना रावेर -यावल तालुका संयुक्त बैठक सावदा शासकीय विश्राम गृह येथे संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.[ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे की दिनांक 19/12/2021 रोजी रावेर यावल तालुका मीळून शासकीय विश्राम गृह सावदा येथे तातडीची बैठक संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या अध्यक्षखाली पार पडली बैठीकित 1 जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिन या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन या संदर्भात कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन करण्यात आले. [ads id="ads2"]
तसेंच फैजपूर विभागात रावेर यावल मिळून पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. तसेच रावेर तालुका कार्यकरणीत फेरफार करण्यात आला संघटनेचेच्या बळकटी साठी कार्यकर्त्याना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. बैठीकित उपस्थितीत जिल्हा नियोजन प्रमुख महेश तायडे जिल्हा रोजगार मंचचे युराज सोनवणे जिल्हा नियोजन उपप्रमुख सदाशिव निकम जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे रावेर तालुका अध्यक्ष चंद्रकांत गाढे, उपाध्यक नारायण सवरणे, तालुका युवा अध्य्क्ष विजय धनगर, कार्यालयीन सचिव बाळू निकम, यावल तालुका युवा अध्यक्ष विशाल तायडे, अरविंद भालेराव, शे. जलील खान, शे. साजिद, शे. इस्माईल, फारुख खान इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते बैठकित भगवान आढाले यांची फैजपूर विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली .
तसेच एकनाथ गाढे यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर शांताराम तायडे यांची फैजपूर विभाग उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. रावेर तालुका कार्यकारणीत फेरबदल करून शरद बागडे यांची कार्याआध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली. याप्रसंगी नंदाताई बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुका महिला आघाडी अध्यक्ष लक्ष्मीताई मेढे यांची नेमणूक करण्यात आली.विलास तायडे शे. वसीम शे. राऊफ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव निकम यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधीर सैन्गमिरे यांनी मानले.