उद्या दि.२० डिसेंबर सोमवार रोजी रथाची शहरातून भव्य परिक्रमा व परवा दि. २१ डिसेंबर मंगळवार रोजी पालखी उत्सव होणार. प्रशासनाने जरी यात्रेतील दुकानांना परवानगी दिली नसली तरी या उत्सवात परवानगी दिल्यामुळे शहर व परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.[ads id="ads2"]
येथील १८३ वर्षांची परंपरा असलेला उत्सव आज पासून साजरा होत आहे. येथील नाला भागातील परिसरात माहूर गडावरून आलेले श्री सच्चिदानंद महाराज उर्फ दत्त महाराज यांनी येथे दत्त मंदिराची स्थापना केली. शहर व परिसरातील नागरिकांनी, भाविकांनी व सर्व समाजाने एकत्र यावे या दृष्टीने दत्त जयंती निमित्त तीन दिवसीय यात्रोत्सवास सुरुवात केली. ती परंपरा आजतागयत सुरू आहे. मागील वर्षी कोरोना मुळे केवळ रथाची आणि पालखी तिची पूजा करून काही पावलं रथ आणि पालखी चे पूजन करण्यात आले. मात्र रथाची व पालखी ची परिक्रमा शहरातुन झाली नव्हती. मात्र यावर्षी प्रशासनाने परवानगी दिल्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण आहे. मंदिराचे गादीपती ह भ प श्रीपाद महाराज कुलकर्णी यांचे पुत्र ऋषिकेश कुलकर्णी, श्रीरंग कुलकर्णी व शहरातील भाविक या महोत्सवाचे नियोजन करीत आहे. तसेच येथील बाविसे गल्लीतील लहान दत्त मंदिरात उत्सवानिमित्त गीता जयंती, श्रीमद भगवत गीता पठाण, गुरुचरित्र पारायण, व महिला मंडळाचे सुंदरकांड चा कार्यक्रम झाला. उद्या दत्त जन्मोत्सव व प्रवचनाचा कार्य क्रम होईल असे नारायण शा स्त्री दुबे यांनी कळविले आहे.