जळगाव स्थानिक गुन्हे शाखेसह स्थानिक रावेर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत रावेर शहरातून आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधींची किंमत असलेले तब्बल अर्धा किलो हेरॉईन (ब्राऊन शुगर) जप्त केल्याची कारवाई शनिवारी केली होती. [ads id="ads1"]
या प्रकरणी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून अख्तरी बानो अब्दुल रऊफ (45, रा.मोमीनपुरा बडा, कमेलापास, ता.जि.बर्हाणपूर) या महिलेला अटक करण्यात आल्यानंतर भल्या सकाळी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात महिलेला न्या.एस.पी.डोलारे यांच्या न्यायासनासमोर हजर करण्यात आल्यानंतर महिलेला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. [ads id="ads2"]
दरम्यान, देशात प्रतिबंधीत हेरॉईन महिलेने सलीम खान शेर बहादुर खान (किटीयानी कॉलनी मनसौर, मध्यप्रदेश) याच्याकडून घेतल्याची कबुली दिल्याने या आरोपीचा पोलिस पथकाकडून शोध सुरू करण्यात आला आहे.
अटकेतील महिलेला पाच दिवसांची पोलिस कोठडी
अटकेतील महिलेला अख्तरी बानो हिला पोलिस बंदोबस्तात रविवार, 19 रोजी सकाळीच भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्या.एस.पी.डोलारे यांनी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आरोपीतर्फे अॅड.सत्यनारायण पाल तर सरकार पक्षातर्फे अॅड.मोहन देशपांडे यांनी बाजू मांडली. यावेळी तपासाधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक उपस्थित होते.

